Sunday, August 23, 2020

मराठी प्रेम कविता


त्या समुद्राच्या किनारी..... 

त्या समुद्राच्या किनारी ......
घेतला होतास तू माझा हाथ तुझ्या हाथी 
बांधल्या होत्यास तू फ़क्त नात्याची नाही तर 
आपल्या मनाच्या गाठी 
म्हणालास होतास तू मला 
'करणार मी तुझे आनंद दुप्पट '
त्या मावळत्या सूर्याची खाऊनि तू शप्पत 
आला होतास तू माझ्या आयुष्यात 
पायावरील येणार्‍या त्या थंडगार समुद्राच्या लाटांसारखा
आणि कळलच नाही 
कधी तू आयुष्यातून निघून गेला 
त्या आकाशात उडत्या ढगां सारखा
तू तर निघून गेलास सोडून मला एकट
किनार्‍यावर या 
त्या ढगात उडत्या पाखरांसारखा
पण जरा एकदा तरी येऊन बघ 
आता पण वाट बघत बसून आहे मी तुझी 
त्याच समुद्राच्या किनारी .....
आता पण वाट बघत बसून आहे मी तुझी 
त्याच समुद्राच्या किनारी............ 


-Ishika wanjari

1 comment: