Sunday, August 23, 2020

love poem in marathi


तुलाच शोधत आहे मी ..

तुझ्या त्या गोड आवाजाला 
सतत ऐकण्याचा प्रयत्न करत आहे मी 
त्या पाखरांच्या कुजबुजन्यातील पण 
तुझाच आवाज शोधत आहे मी 

तुझ्या त्या गालावरील स्पर्शाचा 
सतत अनुभव घेत आहे मी 
डोळे मिटूनि त्या सडसडनार्‍या वार्‍यातील  पण 
तुझाच स्पर्श शोधत आहे मी 

तुझ्या त्या हसर्‍या चेहर्‍याचा पण 
सतत मनात चित्र बनवत आहे मी 
डोळ्यातल्या अश्रूं मधे पण
तुझाच चेहरा शोधत आहे मी 

तुझ्या त्या जपून ठेवलेल्या आठवणीना 
क्षणोक्षणी आठवत आहे मी 
तुझी वाट बघत जिथे तिथे 
तुलाच शोधत आहे मी 

 -Ishika wanjari

No comments:

Post a Comment